पुण्यात मद्यधुंद बिल्डरचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, वादातून आठ वर्षांच्या मुलीवर रिव्हॉल्व्हरने गोळीबार !

पुणे, २४ सप्टेंबर – महाराष्ट्रातील पुणे शहरात पत्नीसोबत झालेल्या वादातून एका व्यक्तीने आठ वर्षांच्या मुलीवर गोळ्या झाडून जखमी केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पांडुरंग उभे (३८) या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला आणि त्याची पत्नी व इतर कुटुंबीयांशी वाद झाला.
अधिकारी म्हणाले की, त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर काढून पत्नीकडे दाखवले. दरम्यान, त्यांची मुलगी राजनंदिनी आरडाओरड करू लागली, त्यानंतर आरोपीने मुलीवर गोळीबार केला.
त्यांनी सांगितले की मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ते म्हणाले की, या प्रकरणासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.