अजिंठा अर्बन बॅंकेचे चेअरमन सुभाष झांबडसह संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी व कर्जदार 68 जणांवर गुन्हा दाखल ! डबल नावानंतर आता दुसराच घोटाळा, एकाच्या एफडीवर दुसऱ्याला कर्ज !!

छत्रपती संभाजीनगर -: सहकार बॅंकेत घोटाळा करण्यासाठी कुख्यात असलेला सुभाष झांबड यांचे एकानंतर एक घोटाळे समोर येत आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांना लुबाडणारा सुभाष झांबडचा बुरखा आता टराटरा फाटत असून एका मागोमाग एक गुन्हे सुभाष झांबडवर दाखल होत आहे. DICGC ईन्शुरन्स क्लेम मिळण्यासाठी सुभाष झांबड याच्या सांगण्यावरून कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या डबल नावाच्या घोटाळ्यानंतर आता दुसराच घोटाळा समोर आला आहे. एकाच्या एफडीवर दुसर्याला कर्ज दिल्यामुळे संबंधीताचे DICGC ईन्शुरन्स क्लेम नामंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नव्या घोटाळ्याप्रकरणी अजिंठा अर्बन को आप बँक लि.चे चेअरमन सुभाष झांबड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, तत्कालीन अधिकारी, कर्जदार अशा ६८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे संपूर्ण सहकार विभागात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी चेतन सुभाष भारुका (छत्रपती संभाजीगर) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून, माहे ऑगस्ट 2022 मध्ये अजिंठा अर्बन को आप बँक लि. मुख्य शाखा जाधवमंडी येथील व्यवस्थापक चेतन गादीया व उस्मानपुरा शाखेच्या व्यवस्थापक दिपाली कुलकर्णी यांनी फिर्यादी चेतन भारुका व त्यांच्या वडीलांची भेट घेऊन सांगितले की, ईतर बँकांपेक्षा अजिंठा अर्बन को आप बँक लि. बँकेत मुदत ठेवीवर जास्तीचे व्याजदर दिले जाते, तुम्ही ईतर बँकेत रक्कम जमा ठेवण्यापेक्षा अजिंठा अर्बन बँकेत 15 महिन्यां करीता मुदतठेव (FD) मध्ये रक्कम ठेवा, तुम्हाला FD ठेवींवर 11% व्याजदराने परतावा देऊ व तुम्हास पाहिजे तेंव्हा गरजेला तुमचे पैसे परत देवू, बँकेचे चेअरमन सुभाष झांबड आहेत असे सांगितले होते. अजिंठा बँकेत एफडी. मध्ये रक्कम ठेवल्यास पुढे मुलींचे शिक्षण लग्न, आई वडीलांचा दवाखाना खर्चाकरीता पैसे कामात येतील म्हणून चेतन गादीया व दीपाली कुलकर्णी यांचे बोलण्यावर विश्वास ठेवून अजिंठा अर्बन को आप बँक लि. औरंगाबाद मुख्य शाखा व जाधवमंडी व शाखा उस्मानपुरा यांच्याकडे मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवणुक केलेली आहे.
यादरम्यान अजिंठा अर्बन को. ऑप बँक लि.चे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी खोटे व बनावट F.D अगेन्स्ट लोनच्या माध्यमातून मोठमोठ्या रकमेचे कर्ज उचल घेवून तसेच खोटे व बनावट बँक बॅलन्स प्रमाणपत्र RBI ला सादर करून आर्थिक अपहार केल्याचे RBI च्या पडताळणीमध्ये निदर्शनास आल्याने RBI कडून माहे ऑगस्ट 2023 मध्ये सदर बँकेवर आर्थिक निर्बंध येऊन प्रशासकाची नेमणुक झाल्याची माहिती फिर्यादी चेतन भारुका यांना झाली. ही माहिती मिळताच माहे ऑगस्ट 2023 मध्ये ठेवी रक्कम परत मिळाव्या म्हणून अजिंठा अर्बन को. ऑप बँक लि.च्या मुख्य शाखा जाधवमंडी येथे जाऊन व्यवस्थापक चेतन गादीया व उस्मानपुराच्या शाखा व्यवस्थापक दिपाली कुलकर्णी यांना भेटलो त्यांनी फिर्यादी चेतन भारुका यांना सांगितले की, तुमच्या मुदत ठेवी रक्कम तुम्हाला सध्या देऊ शकत नाही. तुमची ठेव रक्कम तुम्हाला काही दिवसानंतर परत मिळतील. त्यानंतर अजिंठा अ.को. ऑप बँकेचे चेअरमन श्री सुभाष माणकचंद झांबड यांची मुख्य शाखा जाधवमंडी येथे मी भेट घेवून माझ्या ठेवी बाबत विचारणा केली असता त्यांनी सुध्दा, तुमचे पूर्ण पैसे मी परत करेल, तुम्हाला पैसे नाही मिळाले तर मी जबाबदार आहे असे सांगितले होते. दिनांक 01/04/2024 व दि.21/12/2024 ते 23/12/2024 रोजी दरम्यानDICGC ईन्शुरन्स क्लेम अंतर्गत फिर्यादी चेतन भारुका यांना मुदत ठेव रकमेपैकी एकूण 14,00,000/- रुपये (चौदा लाख रुपये) एसबीआय. बँकेच्या खात्यामध्ये मिळाले.
त्याव्यतिरीक्त रक्कम फिर्यादी चेतन भारुका यांना मिळाली नाही. मुदत ठेव रकमेचे व्याजासह रक्कम 11,35,000/- रुपये (अकरा लाख पस्तीस हजार) बँकेकडून येणे बाकी आहे. दिनांक 22/10/2024 रोजी सकाळी 11:00 वाजे सुमारास फिर्यादी भारूका घरी असतांना, डाक पोस्टाद्वारे कैलास & असोसिएट्स चार्टर्ड अकाऊंटंट श्री के. एम. अग्रवाल सीए. यांचेकडून फिर्यादी भारुका यांच्या मुलीच्या नावाने त्यांना समन्स प्राप्त झाले असून त्याद्वारे त्यांनी विचारणा केली की, 1) अंजिंठा अर्बन को. ऑप बँक लि. येथील एफ.डी क्र.44021 ही तुमची आहे का, 2) तुम्ही ईतरांच्या नावे ती FD केली आहे काय ? 3) ID अगेन्स्ट कर्जधारक श्री डमाले पाटील सोपान यांचे FDOD कर्ज परतफेड (कर्ज भरणा) करण्याकरीता त्या कर्जात तुमची एफ डी जमा दाखविण्यासाठी तुम्ही सहमती दिलेली आहे काय ? जर सहमती दिलेली असेल तर त्याबाबतचे कागदपत्रे घेऊन कार्यालयात हजर राहणे बाबत कळविण्यात आले होते. समन्सनुसार फिर्यादी भारुका फॉरेन्सीक ऑडीटर कैलास असोशिएटस श्री. अग्रवाल यांचेकडे हजर झाले तेंव्हा त्यांचेकडून कळाले की, त्यांच्या मुलीच्या नावे अंजिंठा अर्बन को. ऑप बैंक लि. बँकेत असलेली एफडी. रूपये 5,00,000/- हे दिनांक 04/03/2023 रोजी विड्रॉल करून ते 5,00,000/- रुपये FDOD खाते डमाले पाटील सोपान यांचे कर्ज खाते निल करण्यासाठी वापरले (खात्याला जमा केले) आहे असे सीए. अग्रवाल यांनी सांगितले. त्यावर फिर्यादी भारुका यांनी त्यांना सांगीतले की, सदर FD डमाळे सोपान यांचे कर्जास वापरण्यासाठी सहमती दिलेली नाही, त्यांना ओळखत नाही, त्यांची मुलगी नाबालीक आहे.
त्यावेळी फिर्यादी भारुका यांच्या लक्षात आले की, त्यांची मुलीच्या नावे अजिंठा अर्बन को. ऑप बँकेत 5,00,000 रूपये FD केलेली असतांना व तिचा पालक असतांना त्यांची सहमती न घेता परस्पर कर्जदार डमाळे पाटील सोपान यांचे नावाचे FD अगेन्स्ट कर्ज परतफेड (एफडी खाते क्लोज) करण्याकरीता अजिंठा अर्बन को. ऑप बँक लि. येथील संचालक मंडळ पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी 5,00,000/- रुपये FD वापर केला असून आता त्या FD चे 5,00,000/- रुपये DICGC ईन्शुरन्स क्लेम अंतर्गत फिर्यादी भारुका यांना मिळु शकत नाही असे अजिंठा अर्बन को. ऑप बँक लि.चे प्रशासक यांनी समक्ष कळविले आहे.
अजिंठा अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लाधल्याने, आमची FD सहमतीशिवाय सोपान डमालेचे कर्ज फेडण्यास वापरल्याने फिरायीदीचे इतर FD ची रक्कम विहीत मुदतीत परत मिळत नसल्याचे त्यांची आई चंदा सुभाष भारुका वय 68 वर्षे, यांना समजल्याने त्याची धास्ती घेवून त्यांची आई आजारी पडुन हृदयविकाराने दिनांक 15/09/2024 रोजी दंडे हॉस्पीटल, एन-2 सिडको छत्रपती संभाजीनगर येथे उपचार चालू असतांना मृत्यु झाला आहे.
अजिंठा अर्बन को ऑप. बँक लि. औरंगाबाद बँकेचे सन 2006 ते 2023 या कालावधीतील चेअरमन संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी तसेच 36 एफडी. कर्जदार यांच्याविरोधात फिर्याद देण्यात आली आहे.
सदर फिर्यादीवरून चेअरमन 1) सुभाष माणकचंद झांबड, 2) घेवरचंद मोतीलाल बोथरा 3) तनसुख माणकचंद झांबड 4) नवीनचंद संघवी 5) राजेंद्रसिंग जबिंदा 6) जितेंद्र मुथा 7) संजय फुलपगर ४) हरीष भिकचंद चिचाणी 9) सुशिल बलदवा 10) महेश मन्साराम जसोरीया 11) सोपान तुळशीराम शेजवळ 12) उमेश डोंगरे 13) माणिक चव्हाण 14) रजनी देसरडा 15) माधुरी अग्रवाल 16) अनिल धर्माधिकारी 17) रविंद्र वाणी 18) संजय मिठालाल कांकरीया 19) शिरीष गादीया 20) दादासाहेब गंडे 21) नितीन रतनलाल मुगदीया 22) विद्या प्रफुल्ल बाफना 23) कांचन श्रीमंतराव गोर्डे 24) अब्दूल पटणी 25) सुनिल शंकरलाल सवईवाला 26) दिलीप हिराचंद कासलीवाल तसेच बँकेचे अधिकारी 27) CEO प्रदीप एकनाथ कुलकर्णी 28) मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ 29) शाखा व्यवस्थापक चेतन खुशालचंद गादीया, 30) दिपाली देवेंद्र कुलकर्णी तसेच FDOD कर्जदार नामे 31) जैन सुभाष,32) बाचकर राजु, 33) सुराणा घेवरचंद,34) पाटणी विनोद, 35) जोशी पदमाकर, 36) दमाले पाटील, 37) पवार एस.एस., 38) गायकवाड उत्तम डी. 39) सुराणा हेमलता, 40) गुजर राहुल, 41) कुलकर्णी रंगनाथ, 42) बोरा रेश्मा संदिप, 43) फळेगावकर प्रशांत, 44) दांगोडे गणेश ए., 45) पारख डी. एफ. 46) गोरे रुस्तुम, 47) संतोष सकाहारे, 48) सी. टी. सक्सेना, 49) नौसिन सबा, 50) पाटील संतोष, 51) पाटील जगन्नाथ,52) गोरे मथाजी आर., 53) जैस्वाल सुनंदा, 54) पोपट बी. साखरे, 55) जसोरिया महेश, 56) जैन परेश, 57) खंडेलवाल महेश, 58) ढोका वंश, 59) जैन सुरेंद्र, 60) टकले रमेश, 61) पाटील डी. आर., 62) जैन एस. एस., 63) अग्रवाल साधना एस. 64) अग्रवाल सुभाष एच. 65) जाधव रमेश आणि 66) मिश्रा बिमल, तत्कालीन अधिकारी 67) अनिल वसं त धर्माधिकारी 68) रविंद्र वाणी यांच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.