महाराष्ट्र
Trending

आधार कार्ड प्रमाणीकरण, मोबाईल संलग्नीकरण करून घ्या अन्यथा अनुदान होणार बंद ! विशेष सहाय्य योजना !!

विशेष सहाय्य योजना; आधार प्रमाणिकरण, मोबाईल संलग्निकीकरण करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि.१ :- विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड प्रमाणिकरण तसेच मोबाईल, संलग्निकीकरण करावे असे आवाहन तहसिलदार (संगायो) उत्तम बहुरे यांनी केले आहे.

शहर विभागाअंतर्गत संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना इ. विशेष अर्थ सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचे मासिक अनुदान डीबीटीद्वारे थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी तहसिलदार संजय गांधी निराधार योजना, शहर विभाग, आधार भवन छत्रपती संभाजीनगर येथे आधार कार्ड व डीबीटी प्रणाली अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. या योजनेच्या काही लाभार्थ्यांची उपलब्ध माहिती व आधार कार्डवरील माहिती यात तफावत आढळून येत आहे.

काही लाभार्थ्यांनी आपल्या जन्म दिनांक तसेच आधार कार्डावरील नावातही बदल केला आहे, त्याबाबत कार्यालयास काहीही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे आधार प्रमाणिकरण होत नाही. तसेच आधार कार्डला संलग्न मोबाईल लाभार्थ्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे. तरी लाभार्थ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करावे तसेच आधार मोबाईल संलग्निकीकरण करावे,असे आवाहन तहसिलदार उत्तम बहुरे यांनी केले आहे. आधार प्रमाणिकरण व संग्निकीकरण न झाल्यास माहे जानेवारी २०२५ चे अनुदान मिळणार नाही ,असेही त्यांनी कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!