धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अजितदादांसमोर ग्रामस्थांच्या घोषणा ! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ग्रामस्थांची आर्त हाक !!

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना विविध पक्षांचे पदाधीकारी देशमुख कुटुंबाच्या सांत्वनासाठी जात आहे. यातच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले खरे मात्र, कोणतेही ठोस आश्वासन न देता अजित दादांनी काढता पाय घेतल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, वाल्मिक कराडला अटक करा आदी घोषणा काही ग्रामस्थांनी दिल्या. कुटुंबाचे सांत्वन करून परत जाण्यासाठी अजितदादा आपल्या गाडीकडे जात असताना ग्रामस्थ घोषणा देत होते. या ग्रामस्थांचे म्हणने न ऐकताच दादांनी काढता पाय घेतल्याने आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे. फक्त औपचारीकता दाखवण्यासाठी अजितदादा भेट देण्यासाठी आले होते का ? देशमुख यांची हत्या होवून १३ दिवस उलटले मात्र, अजूनही तीन आरोपी फरार आहेत, याचा काय अर्थ घ्यावा असा प्रश्नही काही ग्रामस्थांनी उपस्थित केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली तेंव्हा त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी, रमेश आडसकर, योगेश क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी देशमुख यांच्या कुटुंबांस भेटून त्यांचे सात्वन केले.
दरम्यान, कुटुंबाची भेट घेवून परत जाण्यासाठी अजितदादा आपल्या गाडीकडे जात असताना काही ग्रामस्थांना आपल्या भावना आवरता आल्या नाही. त्यामुळे त्या ग्रामस्थांनी घोषणा दिल्या. दादा आमचं ऐकून घ्या असा जमाव म्हणत होता मात्र, दादांनी काहीही ऐकून न घेता जमावातून काढता पाय घेतला व गाडीत बसून निघून गेले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवू नका, वाल्मिक कराड यांना अटक करा आदी घोषणा ग्रामस्थ देत होते.
दादा आमचा निकाल लागेपर्यंत ठेवू नका…दादा मंत्रिमंडळातून काढा… धनंजय मुंडे यांनी पक्षपात केला आहे… धनंजय मुंडेना मंत्रिमंडळात ठेवू नका अशी आर्त हाक ग्रामस्थांनी अजितदादांना दिली मात्र, अजितदादांनी घोषणा देणार्या ग्रामस्थांचे म्हणने न ऐकताच गाडीत बसून काढता पाय घेतला.