नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गावकऱ्यांनी झाडाला बांधून ठेचून मारले !

कटिहार, 06 ऑक्टोबर – बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील हसनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी ही माहिती दिली.
कटिहार सदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी ओम प्रकाश यांनी पत्रकारांना सांगितले की, “पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.”
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी मोहम्मद सगीर याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगीरला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी स्थानिक लोकांनी गुरुवारी सकाळी त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गंभीर जखमी सगीरला सदर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.