NEET, JEE चा घोळ तूर्त मिटला, पुढील दोन वर्षांसाठी CUET शी जोडण्याची कोणतीही योजना नाही !
केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

कोटा (राजस्थान), 7 सप्टेंबर – केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, अभियांत्रिकी ‘JEE’ प्रवेश परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET’ या विद्यापीठाच्या सामायिक प्रवेश परीक्षेशी (CUET) जोडण्याची कोणतीही योजना नाही.
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी गे महिन्यात सांगितले होते की JEE आणि NEET भविष्यात CUET मध्ये विलीन केले जातील.
कोटा येथे एका दिवसाच्या भेटीदरम्यान, प्रधान यांनी अॅलन करिअर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि ते म्हणाले,
“NEET, JEE आणि CUET ला जोडणे ही सध्या एक संकल्पना आहे, एक कल्पना आहे आणि सरकारने अद्याप त्यावर तत्वतः निर्णय घेतलेला नाही.”
प्रधान म्हणाले की NEET, JEE ला CUET शी जोडण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि या तीन परीक्षांचे विलीनीकरण करून एकत्रित परीक्षा घेण्याच्या संकल्पनेवर निर्णय घेण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील.