राष्ट्रीय
Trending
12.1 लाखांसह एटीएम चोरट्यांनी पळवले ! सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध

जयपूर, 22 सप्टेंबर – राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात, चार-पाच अज्ञात चोरट्यांनी एका वाहनाच्या (एसयूव्ही) सहाय्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एटीएम फोडले आणि 12.1 लाख रुपयांची रोकड लंपास केली. पोलिसांनी ही माहिती दिली.
‘चौथ का बारवारा’चे पोलिस अधिकारी टीनू सोगरवाल यांनी माहिती दिली की, सारसोप गावात असलेल्या एसबीआयच्या एटीएममध्ये बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम पळवून नेल्याची घटना घडली. मशीनमध्ये 12.10 लाख रुपयांची रोकड असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बँक व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ‘चौथ का बरवडा’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.