रशियन शाळेत गोळीबार, 9 ठार, 20 जखमी ! मृतात 2 सुरक्षा कर्मचारी, 2 शिक्षक आणि 5 विद्यार्थ्यांचा समावेश !!

मॉस्को, 26 सप्टेंबर – मध्य रशियामध्ये सोमवारी सकाळी एका बंदुकधारी व्यक्तीने एका शाळेवर हल्ला केला, ज्यात नऊ जण ठार आणि 20 जण जखमी झाले.
रशियाच्या तपास समितीने ऑनलाइन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उदमुर्तिया राजधानी इझेव्हस्क येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन सुरक्षा कर्मचारी, दोन शिक्षक आणि पाच विद्यार्थी ठार झाले.
उदमुर्तियाचे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रेचालोव्ह यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे, अज्ञात बंदूकधाऱ्याने स्वत:वरही गोळी झाडली.
ज्या शाळेत हा हल्ला झाला, त्या शाळेत पहिली ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते.
अधिकारी म्हणाले की, शाळा रिकामी करून परिसराची नाकेबंदी करण्यात आली.
हल्लेखोर कोण होता आणि त्याचा हेतू काय होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इझेव्हस्कमध्ये सुमारे 640,000 लोक राहतात. हे मध्य रशियाच्या उरल पर्वत प्रदेशाच्या पश्चिमेस, मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे 960 किमी अंतरावर आहे.