पंकूताई तुम्हाला जी हुजूर.. जी हुजूर करणारे पाहिजे, आमची औलाद जी हुजूर करणारी नाही: आमदार सुरेश धस यांचा हल्लाबोल
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला का गेला नाहीत, आमदार सुरेश धस यांचा मंत्री पंकजा मुंडे यांना सवाल

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ – पंकूताई तुम्हाला जी हुजूर.. जी हुजूर करणारे पाहिजे, आमची औलाद जी हुजुर करणारी नाही. आमची औलाद स्वाभीमानी आहे. तुमच्यापुढं जी हुजुर करणार नाही. आजपर्यंत केलं नाही अन् उद्याही करणार नाही. भलेही राजकारणातून बाजूला जावू असा हल्लोबोल आमदार सुरेश धस यांनी केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना तातडीने अटक करा या प्रमुख मागणीसह बीड शहरात काढण्यात आलेल्या मूक मोर्चा प्रसंगी धस बोलत होते. मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला का गेला नाहीत, असा सवालही आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना केला. याच्या उत्तराची तशी तुमच्याकडून अपेक्षाही नाही, असेही धस यावेळी म्हणाले.
स्व. संतोष देशमुख यांच्या घरी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांत्वनपर भेट द्यायला पाहिजे होती अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार सुरेश धस म्हणाले की, पंकूताई माझा सवाल आहे तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर एयरपोर्टवर तुम्ही उतरला १२ तारखेला तुम्हाला स्व. गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं वाकडी वाट करून तुम्ही संतोष देशमुख यांच्या घरी का गेला नाहीत हो ? का नाही गेला ? हा सवाल आहे माझा तुम्हाला. धनु भाऊ तुम्ही जे बोललात ना गोपिनाथगड. अरे स्व. गोपिनाथ मुंडे कोण ? गोपिनाथ मुंडे यांनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गॅंगवार कोणी जर बंद केलं असल तर ते गोपिनाथराव मुंडे यांनी बंद केलं. गोपिनाथ मुंडे साहेबाच्या सोबतही आम्ही दहा दहा वर्षे काम केलं. तो अनुभव वेगळा आहे. तुमच्या पुढं काम करणं हा अनुभव वेगळा आहे. तुम्हाला चांगले मोठाले ज्ञानी जे माणसं चांगले आहेत ते तुम्हाला जमत नाही पंकूताई. तुम्हाला असे पाहिजे जी हुजुर… जी हुजुर… आमची औलाद जी हुजुर करणारी नाही. आमची औलाद स्वाभीमानी आहे. तुमच्यापुढं जी हुजुर करणार नाही. आजपर्यंत केलं नाही अन् उद्याही करणार नाही. भलेही राजकारणातून बाजूला जावू परंतू पंकूताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आला नाहीत. तुम्ही चुकलात. याचं उत्तर द्या काय असेल ते. देऊवाटलं तर द्या नाही तर आपेक्षादेखील नाही. नाहीच भेटायला आल्या तर आपेक्षा काय आहे तुमच्याकडून ? किमान तुमच्याकडून आपेक्षा होती, असेही धस म्हणाले.