
छत्रपती संभाजीनगर -: बीड पोलिस अधीक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भातील शासन आदेश दिनांक : 21.12.2024 रोजी जारी करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी व खूनाचे सत्र थांबवण्याचे मोठे आव्हान आता नवनीत कॉवत यांच्यासमोर आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद भा.पो.से. अधिका-याची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.
नवनीत कॉवत यांची विद्यमान पदस्थापना पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर येथे होती आता त्यांची बदलीने पदस्थापना पोलीस अधीक्षक, बीड येथे करण्यात आली आहे. तसेच अविनाश बारगळ, भा.पो.से., यांची बदली करण्यात येत असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.