राष्ट्रीय
Trending
निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला !
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

तिरुवनंतपुरम, 2 नोव्हेंबर – केरळ सरकारने बुधवारी सर्व राज्य सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी (पीएसयू) सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.
केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय-एम) नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) सरकारचा हा निर्णय विरोधी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) याला राज्यातील तरुणांसोबतची फसवणूक असल्याचे सांगत निषेध केला होता.
तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे शनिवारी हा आदेश जारी करण्यात आला. तज्ज्ञ समितीने सर्व राज्य पीएसयू कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय एकसमान म्हणजेच ६० वर्षे असावे, अशी शिफारस केली होती.