महाराष्ट्र
Trending

फोन कट कर, कोणाशी बोलते असे म्हणून आईने रागाने दोन चापट मारल्या अन् १६ वर्षीय मुलगी बेपत्ता ! फुस लावून पळवून नेल्याची आईची पोलिसांत तक्रार !!

छत्रपती संभाजीनगर – फोन कट कर, कोणाशी बोलते असे म्हणून आईने रागाने दोन चापट मारल्या अन् त्यानंतर काही वेळाने १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. फुस लावून पळवून नेल्याची तक्रार आईने जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

यासंदर्भात मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 19/12/2024 रोजी दुपारी 02.30 वाजेच्या सुमारास फिर्यादीची 16 वर्षीय मुलगी (रा. छत्रपती संभाजीनगर) ही मोबाईलवरुन कोणाशी तरी बोलत होती. फोन कट कर असे आईने तिला सांगितले व कोणाशी बोलत आहे असे विचारुन रागाने दोन चापट मारल्या. त्यानंतर मुलगी आईला म्हणाली की, मी तुमच्या सोबत राहत नाही मी माझ्या दादीकडे जाते असे म्हणुन तिने दोन तीन ड्रेस घेवून बॅग भरली. परंतु ती 08:00 वाजेपर्यंत घरीच होती. त्यानंतर मुलीची आई रात्री 08:30 वाजेच्या सुमारास किराणा आणन्यासाठी गेली. परत घरी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आली असता मुलगी घरी दिसून आली नाही. कुटुंबातील सदस्यांनी आजुबाजुच्या परिसरात, नातेवाईक, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन येथे शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये दिली असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!