महाराष्ट्र
Trending

फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकल्या ! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकल्या. पुण्यात त्यांना ताब्यात घेतलं. बीडच्या पोलिसांनी ही कारवाई करत त्या दोघांना एसआयटीच्या स्वाधीन केलं.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आलेली होती त्यात आता आणखी दोघांची भर पडली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, वाल्मिक कराड यांच्यावर केवळ पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. परंतू वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड अटकेत असून त्यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघा आरोपींना आज केजच्या कोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे.

Back to top button
error: Content is protected !!