महाराष्ट्र
Trending
⚖️हूंडीवाले हत्या प्रकरणाचा थरारक निकाल 6 वर्षांनंतर न्याय😱🔔10 जणांना जन्मठेप 🚨⚖️

अकोल्यातून मोठी बातमी.. गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तीवाद पार पडला. तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 6 मे 2019 रोजी पोलीस अधिक्षकांच्या शासकीय बंगल्याबाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हूंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती.
हत्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर यांच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश होता.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते. यात 10 आरोपींना जन्मठेप शिक्षा झालीय. तर फारसे पुरावे नसल्यामुळे पाच जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.. या निकालावेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील खासदार उज्वल निकम उपस्थित होते..






























