आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेविदारांचा मोर्चा पोलिसांनी अडवला ! पोलिस आणि मोर्चेकरांत ढकलाढकली बॅरिगेड्सही ढकलले, आम्ही लाठ्या खायला तयार खा. इम्तियाज जलील पोलिसांवर संतापले !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १६- संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भातील ठेवीदार आज आक्रमक झाले. मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा निघाला असता पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी मोर्चेकरी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा नेण्यास ठाम होते. यामुळे पोलिस आणि मोर्चेकरी यांच्यात सौम्य ढकलाढकली झाली. मोर्चेकर्यांनी बॅरिगेडस बाजूला करून मोर्चेकरी मंत्रिमंडळ बैठकीकडे रवाना झाले. एकतर मोर्चा मंत्रिमंडळ बैठकीवर जाऊ द्या अन्यथा एका मंत्र्याने मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारण्यास यावे यावर खा. इम्तियाज जलील ठाम होते.
भडकल गेट येथे मोर्चेकरी मोठ्या संख्यंने जमा झाले होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे प्रथमदर्शनी २०० कोटींचा घोटाळा झाल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या पतसंस्थेतील ठेविदारांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. या मोर्चात खा. इम्तियाज जलील हेही सामिल झालेले आहेत. हा मोर्चा भडकल गेट येथून मंत्रिमंडळ बैठकीवर निघाला. मात्र, पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिस मोर्चेकर्यांना मंत्रिमंडळ बैठकीस जाण्यास मज्जाब करत आहेत.
मंत्र्यांना मोर्चेकर्यांना सामोरे जाण्यास जर वेळ नसेल तर आम्ही लाठ्या खायला तयार आहोत, असे पोलिसांना सुनावले. यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांत सौम्य ढकलाढकली झाली. मोर्चेकरी पोलिसांचे कडे आणि बॅरिगेड्स बाजूला करून मंत्रिमंडळ बैठकीकडे जाण्यावर ठाम होते. खा. इम्तियाज जलील यांनाही पोलिसांनी घेराव टाकला होता. ठेवीदार काहीही ऐकन्याच्या मनस्थितीत नव्हते. सरकारने ठेवीदारांच्या ठेवींची जबाबदारी घ्यावी, या मागणीवर ठेवीदार ठाम होते.
दरम्यान, खा. इम्तियाज जलील आणि पोलिसांत चर्चा झाली. आम्ही सर्व मोर्चेकरी आमखास मैदानावर थांबतो. तेथे मंत्र्याने यावे आणि मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारावे अन्यथा यापुढे मंत्री रस्त्यावर कसे फिरतात ते आम्ही मोर्चेकरी पाहून घेवू असा इशाराही यावेळी देण्यात आला. या मंत्र्यांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये लंच झोडायला वेळ आहे. कार्यकर्त्यांच्या घरी जेवनावळी घ्यायला वेळ आहे परंतू गोर गरीबांच्या बुडालेल्या ठेवीवर निर्णय घ्यायला वेळ नाही असा सवालही खा. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.