महाराष्ट्र

वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण ! सीआयडीच्या 9 पथकातील 150 जणांना गुंगारा देऊन तो पुण्यात शरण आला !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१- दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला फरार वाल्मिक कराड आज दुपारी पुण्यात शरण आला. सुमारे १२ वाजेच्या सुमारास तो शरण आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्याने शरण आल्यानंतर त्यास सीआयडीने अटक केली.

दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन पोलिस बॉडिगार्ड असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर प्रकरण तापले. १५ पेक्षा ज्यास्त गुन्हे दाखल असतानाही शस्रपरवाना दिला कोणी ? याहूनही धक्कादायक म्हणजे पोलिस संरक्षण देणारे अधिकारी यांनी कोणत्या निकषावर वाल्मिक कराडला पोलिस संरक्षण दिले ? सर्व नियमांना डावलून शस्रपरवाना व पोलिस बॉडिगार्ड देणारे अधिकारी आता चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. दरम्यान, वाल्मिक कराड आज दुपारच्या सुमारास पुणे सीआयडीला शरण आला.

वाल्मिक कराड हा २ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात आरोपी असला तरी मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातला तो मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. बीड जिल्ह्यात एकप्रकारे हैदोस घालण्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार सुरेश धस यांनी २८ तारखेच्या मूक मोर्चाप्रसंगी वाल्मिक कराडवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे थेट आरोप केले. एकप्रकारे पालकमंत्रीपद हे वाल्मिक कराडला भाड्याने दिले आहे. त्यामुळे त्याची गुंडगीरी वाढत असल्याचा सूर लोकप्रतिनिधींसह लाखो मोर्चेकर्यांनी काढला होता. मात्र, वाल्मिक कराड अजूनही बेपत्ता आहे. सदरचे प्रकरण हे सीआयडीकडे असून तब्बल ९ पथकातील १५० पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतू तो पुण्याच्या सीआयडीला शरण आला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरुवातीला दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल असा-

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात अगदी सुरुवातीला शिवराज लिबराज देशमुख (वय 39 वर्षे व्यवसाय शेती, रा. मस्साजोग, ता. केज, जि.बीड) यांनी दाखल केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, दिनांक 09/12/2024 रोजी फिर्यादी शिवराज देशमुख हे पिसेगाव येथून दुपारी 03.00 वाजण्याच्या सुमारास धारूर चौकात आले असता, तेथे गावचे सरपंच जे की फिर्यादी शिवराज देशमुख यांचे आतेभाऊ संतोष पंडितराव देशमुख हे त्यांची चार चाकी टाटा ईडिगो गाडी घेवुन धारूर चौक, दांगट पेट्रोल पंपा समोर उभे होते.

फिर्यादी शिवराज देशमुख हे गाडी जवळ गेले असता सरपंच संतोष देशमुख त्यांना म्हणाले की, तुला मस्साजोगला यायचे आहे का, फिर्यादी शिवराज देशमुख यांनी होय म्हटल्याने त्यांना त्यांनी गाडी चालवयाला बसवले. दोघे केज येथून मस्साजोग कडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या पुढे आसलेल्या टोलनाक्या जवळ ते गेले असता टोलनाक्याच्या डाव्या साईडच्या शेवटच्या लाईन मधून जात असताना मधोमध समोरून एक काळ्या रंगाची स्कार्पिओ आडवी लावली.

त्या गाडीतून सहा जण खाली उतरले. त्यातील एकाने येवून फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या बाजुच्या दरवाज्याची काच दगडाने फोडून गाडीत पाहिले व दुस-या (डाव्या) साईडच्या बाजुला जावून संतोष देशमुख (सरपंच) यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली व त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये बळजबरीने बसवून केजच्या दिशेने निघुन गेले. सदर घटनेच्या वेळी पाठीमागे सिल्वहर रंगाची चार चाकी स्विप्ट गाडी थोड्या अंतरावर आली व केजच्या दिशेने परत निघुन गेली. त्यामध्ये काळ्या रंगाची स्कार्पिओ मधील मारेकर्यांचे साथीदार होते. दरम्यान या आशयाचा प्रथम माहिती अहवाल दाखल झाल्यानंतर या प्रकरणात नंतर खूप अपडेट झाले.

दरम्यान, सीआयडी अ‍ॅक्शन मोडवर असून सगळेच मार्ग बंद झाल्याने वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार तो शरण आला.

दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या तीन फरार आरोपींसह खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड या आरोपींची बॅंक खाती गोठवली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार अशी त्यांची नावे आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर केवळ पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. परंतू वाल्मिक कराड हे या खून प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!