
CHH. SAMBHAJINAGAR : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरांमध्ये एका युवकाने मित्रावरच गोळीबार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत असून, बंदुकीच्या 4 गोळ्या यात झाडण्यात आल्या आहेत.
आदिनाथ जाधव असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गोळी झाडणारा मित्र हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी जखमी तरुणाला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.