सातारा पोलिस स्टेशनचा पोलिस हजाराची लाच घेताना जाळ्यात ! दुचाकी सोडवण्यासाठी हजार रुपये घेतले !!

औरंगाबाद, दि. ८ – पोलिस ठाण्यात जमा असलेली मोटारसायकल सोडवून घेण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सातारा पोलिस स्टेशनच्या पोलिस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले. आज, ८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात हा पोलिस हवालदार अलगद अडकला.
तेजराव शंकरराव गव्हाणे (वय 57 वर्ष , पद पो ह., पोलिस स्टेशन सातारा, औरंगाबाद शहर रा. मयुरपार्क) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या मुलाचा अपघात झाल्याने पोलिस स्टेशन सातारा येथील दाखल एम एल सीमध्ये तक्रारदार यांची जमा असलेली मोटार सायकल सोडण्यासाठी पोलिस हवालदार तेजराव शंकरराव गव्हाणे यांनी एक हजारांची लाचेची मागणी आज, ८ डिसेंबर रोजी केली. त्यानुसार त्यांनी आजच पंचासमक्ष ही लाच स्वीकारली.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, दिलीप साबळे पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी रेश्मा सौदागर, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो.ह. रवींद्र काळे , पोलीस नाईक सुनील पाटील, सुनील बनकर, दत्ता होरकटे यांनी केली.