महाराष्ट्र
Trending

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा टाकणारा आहे

राजू शेट्टी

SINDHUDURG |  शक्तिपीठ महामार्ग
– शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक असून गरजेचा नाही
– महाराष्ट्राच्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा टाकणारा आहे
– कोकणच्या बाबतीत विचार केला तर पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आहे. येथील भूमिपुत्रांवर अन्याय करणारा आहे
– कोकण आधीच कोल्हापूरला सात मार्गांनी जोडलेला आहे, त्यामुळे आणखी मार्गाची गरज नाही
– त्यामुळे कुणालाही गरज नसलेला हा महामार्ग करण्याची आवश्यकता नाही
– आमचा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे

कोल्हापूरात शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाबाबत
– हे मोर्चे निघत आहेत कारण मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी
– यातील मोर्चेकऱ्यांनी सांगावे की, यातील संभाव्य यादीत त्यांचे नाव आहे का? हा महामार्ग कोल्हापूरच नव्हे तर सांगलीकरांना सुद्धा महापुराच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे
– महाराष्ट्राचे अर्थकारण हे ऊस पिकावर आहे. राज्यातील २० टक्क्यांहून अधिक ऊस उत्पादन हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होते. परंतु, या शक्तिपीठ महामार्गामुळे ऊसाच्या उत्पादनात २० टक्क्यांहून अधिक घट होणार आहे. एकूणच महाराष्ट्राच्या अर्थकारणावरच याचा दुष्परिणाम होणार आहे

शक्तिपीठाला आमदार, खासदारांचे समर्थन
– तुम्हाला येथील विकास करायचा असेल तर तुमची असेल तेवढी ताकद लावा मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करा
– तुम्हाला जर विकास करायचा असेल तर कोकणातील आंबा, काजू, फणस यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणा, पर्यावरणपूरक उद्योग उभे करा
– या महामार्गासाठी ८६ घर कोटी खर्च होणार आहेत. पण यात वाढ होऊन तो दीड लाख कोटीपर्यंत जाईल. हा सारा पैसा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोलच्या रूपात परत द्यायचा आहे
– मी अत्यंत जबाबदारीने बोलतो की, गडचिरोली येथे जो अडीच हजार एकर जमीन जंगलाखाली होती, तेथील आदिवासींना हुसकावून लावण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणले, ज्यामुळे म्हणजे त्यांना नक्षली ठरविण्यात येईल. सामाजिक चळवळी संपविण्याचा घाट यामध्ये आहे

कोल्हापुरी चप्पल वाद
– इटलीहून प्राडाला यावे लागले हीच कोल्हापूरची ताकद आहे. म्हणून शक्तिपीठाची कळ काढू नका!

Back to top button
error: Content is protected !!