महाराष्ट्र
Trending

वायरमन व गाडीचालकावर गुन्हा, DP ची चैन तुटून पाय फॅक्चर ! शरणापूरच्या घटनेने वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – इलेक्ट्रीक DP ची चैन तुटुन DP गाडीमध्ये पडून व गाडी पुढे सरकल्याने पाय गाडीत अडकून इलेक्ट्रीक DP पायावर पडल्याने पायाचे हाड तीन ठिकाणी फॅक्चर झाले. ही घटना दिनांक 28/11/2024 रोजी दपुारी 4.00 वाजेच्या सुमारास शेत गट नं 108 च्या बाजुला, शरणापूर, छत्रपती संभाजीनगर येथे घडली.

मंगेश विठ्ठलराव बोर्डे व जीवन लव्हाळे अशी जखमींची नावे आहेत. यातील फिर्यादी व जखमी जीवन लव्हाळे व गावातील लोक असे सामूहिक इलेक्ट्रीक DP चे काम करत असताना फिर्यादीच्या गावाचा वायरमन संतोष मोरे व गावातील त्याचा सहकारी नवनाथ कान्हेरे यांनी कुठल्याही प्रकारची सर्वांच्या सुरक्षतेची काळजी न घेता फिर्यादीचा जीव धोक्यात घालून काम करून घेतले व पिकअप गाडी क्रमांक MH 20 GC 2521 च्या चालकाने त्याच्या गाडीत आणलेली इलेक्ट्रीक DP ही त्याच्याच गाडीतूनच पोलवर बसवायची आहे असे माहित असतांना ही त्यांने गाडीचे हँडब्रेक किंवा टायरला कुठल्याची प्रकारची उटी किंवा दगड लावला नाही म्हणुन काम करत असतांना अचानक इलेक्ट्रीक DP ची चैन तुटुन DP गाडीमध्ये जोऱ्यात पडुन व गाडी पुढे सरकल्याने फिर्यादीचा पाय गाडीत अटकुन इलेक्ट्रीक DP ही फिर्यादीच्या उजव्या पायावर पडल्याने फिर्यादीचा उजव्या पायाचे हाड चे तिन ठिकाणी फॅक्चर झाले आहे म्हणुन गुन्हा दाखल .

याप्रकरणी मंगेश विठ्ठलराव बोर्डे (वय 34 धंदा चालक रा. गट नं 108 शरणापूर ता जि छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) वायरमन संतोष मोरे, 2) नवनाथ कान्हेरे, 3) गाडी क्रमांक MΗ 20 GC 2521 चा चालक यांच्यावर गु.र.नं. 242 /2024. कलम- 281, 125(A)(B) BNS सह कलम 134 मो.वा.का नुसार दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह अहिरे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!