महाराष्ट्र
Trending

जोर-जोरात दरवाजा वाजवला… छऱ्याच्या पिस्तुलचा धाक दाखवून खल्लास करण्याची धमकी ! वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर- जोरजोरात दरवाजा वाजवला… छऱ्याच्या पिस्तुलचा धाक दाखवून खल्लास करण्याची धमकी दिल्याची तक्रार वाळूज पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. गंगापूर तालुक्यातील मांडवा गावात दि. 20/12/2024 रोजी 22.30 वाजता हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

शिवाजी भाऊसाहेब काळे (वय 41 वर्षे, रा. मांडवा, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि. 20/12/2024 रोजी 22/30 वाजेच्या सुमारास भरत हा त्याच्या सोबत अनोळखी लोकांना शिवाजी काळे यांच्या घरी येवुन जोर-जोरात दरवाजा वाजवू लागला. त्यावेळी शिवाजी काळे व त्यांच्या पत्नीने खिडकीतून पाहिले असता भरत हा त्याच्या हातात एक पिस्तुल घेवून दरवाजा वाजवत असल्याचे दिसले. त्यामुळे शिवाजी काळे यांनी दरवाजा उघडला नाही व शेजारील नातेवाईकांना फोन करून घराबाहेर बोलवुन घेतले. ते सर्वजण जमा झाल्यानंतर शिवाजी काळे हे घराचा दरवाजा उघडून बाहेर आले.

त्यावेळी भरत याने त्याच्या जवळील पिस्तुल शिवाजी काळे यांच्यावर  उगारुन खल्लास करील अशी धमकी दिली. त्यावेळी त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी भरत यास अडवले व त्यास त्याच्या घरी नेवून सोडले. त्यानंतर शिवाजी काळे हे तक्रार देण्याकरीता रात्री उशीरा वाळुज पोलिस स्टेशन येथे पोहोचले. तेथे पोलीसांना सर्व हकिकत सांगितली व लेखी निवेदन दिले. दि.21/12/2024 रोजी पोलिसांकडून शिवाजी काळे यांना समजले की, पोलिसांनी भरत याच्या घरी जावुन झडती घेतली असता त्याच्या घरात हुबेहुब पिस्तुल सारखे दिसणारे शस्त्र मिळून आले. ते पिस्तुल नसून हुबेहुब पिस्तुल सारखे दिसणारे छ-याची पिस्तुल (एअरगन) असल्याचे पोलिसांनी शिवाजी काळे यांना सांगितले.

याप्रकरणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत भीमाशंकर काळुंके (रा. मांडवा, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि शितोळे हे करीत आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!