हिऱ्याच्या अंगठ्या चोरणारी नोकरांनी अटकेत, प्रियकराला दिल्या होत्या अंगठ्या

NAGPUR | नागपूरतील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथे नुपूर अग्रवाल यांच्या घरी मारिया नोकरानी म्हणून काम करायची. 18 मे रोजी अग्रवाल या घरी एकटाच होत्या त्यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवल्या अंगठ्या संधीचा फायदा घेत कामवालीने चोरून नेल्या. नुपूर अग्रवाल यांच्या जवळ मारिया कामवाली पन्नास हजार मागित होती. आणि ती काही दिवसांपासून कामावर येत नव्हती.
त्यामुळे या संदर्भात अग्रवाल यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असता जरीपटका पोलिसांनी शोध घेतला मारिया ही पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ गावी गेली असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी पश्चिम बंगालला पथक तिच्या येथे पाठवलं आणि मारियाला अटक केलं.
त्यावेळी तिला विचारपूस केली असता हिऱ्याच्या अंगठ्या तिने तिच्या प्रियकर पवन भास्करला दिल्याची कबुली दिली. पवन भास्कर हा मुळचा नाशिकचा असून त्याच मारियासोबत प्रेम प्रकरण होतं. पवन पैसे मागत असल्याने त्या दबावात तिने पैसे देण्यासाठी हिऱ्याची अंगठी चोरी केली अशी माहिती तिच्याकडून मिळाली. पुढील तपास पोलीस करत आहे.