
पुणे, 11 सप्टेंबर – महाराष्ट्रातील पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे 25 ठिकाणी पाणी साचले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
ते म्हणाले की, 10 ठिकाणी झाडे उन्मळल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, यामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाषाण आणि मगरपट्टा येथे अनुक्रमे 55.8 मिमी आणि 55.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन दिवसांत घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन IMD ने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “चंदननगर, कोथरूड, पौड रोड, पाषाण, वानवडी, बीटी कवडे रोड, कात्रज गार्डन, स्वारगेट या भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली.
त्याचबरोबर पाषाण, कोंढवा, पुणे स्टेशन आणि येरवडा येथे झाडे उन्मळल्याच्या घटना घडल्या आहेत. पंचवटीत झाडे पडल्याने दोन वाहनांची धडक झाली. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.”