महाराष्ट्र
Trending

बंजारा हॉटेलमध्ये (सेव्हन हिल) राडा; आमच्याकडे का बघता म्हणून झगडा ! चाकूने पाठीवर वार, खिळ्याच्या फळीने बेदम मारहाण, एकजण ICU मध्ये दाखल !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २ – बंजारा हॉटेलमध्ये (सेव्हन हिल) मध्यरात्रीच्या सुमारास राडा झाला. आमच्या कडे का बघता म्हणून वादाला सुरुवात झाली. या वादाचे पर्यावसन पार चाकूने पाठीवर वार, खिळ्याच्या फळीने बेदम मारहाण करेपर्यंत झाले. फिर्यादी हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतरही सेव्हन हिल परिसरात राडा सुरु होता. फिर्यादी कसेबसे त्यांच्या तावडीतून सुटले खरे परंतू एकाला गंभीर मार लागलेला असून सध्या तो अॅपेक्स दवाखाना ICU मध्ये दाखल आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे. 1/1/2025 रोजी रात्री 01.30 वाजता ही घटना घडली.

सागर गणेश पवार (वय 22 वर्ष धंदा शिक्षण रा. राजनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) याने पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून, दिनांक 1/1/2025 रोजी रात्री 01.30 वाजता बंजारा हॉटेल सेव्हन हिल छत्रपती संभाजीनगर येथे फिर्यादी सागर पवार व त्याचे मित्र जीवन पवार, शरद पवार, जीवन राठोड, सचिन राठोड (रा.राज नगर) हे बंजारा हॉटेल येथे जेवन करण्यासाठी गेले होते. जेवन करत असताना फिर्यादी सागर पवार यांच्या बाजुला बसलेले सुरज गायकवाड व त्यांचे सोबतचा अनोळखी (रा. बौध्दनगर छत्रपती संभाजीनगर) म्हणाले की, तुम्ही आमच्या कडे का बघता असे म्हणून फिर्यादी सागर पवार व त्याचा चुलत भाऊ जीवन पवार यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता असे म्हणताच त्यांनी हाताचापटाने मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यापैकी एकाने जीवन गुलाब पवार यास खुर्चीने तोंडावर मारून जखमी केले. तेव्हा फिर्यादी व त्याच्यासोबतचे हॉटेल बाहेर पडले. त्यानंतर हॉटेल चालक गणेश व त्यांचा मित्र दिनेश जाधव आणि बंजारा हॉटेल सेवन हिल छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल मधील दोन वेटर हे हॉटेलच्या बाहेर येऊन फिर्यादी सागर पवार व त्याच्यासोबतच्यांना मारहाण केली. त्यांना तेथेच पकडून ठेवले त्यानंतर फिर्यादी सोबत हॉटेल मध्ये वाद घालणारे सुरज गायकवाड व त्याचें अनोळखी मित्र यांनी त्यांच्या काही मित्रांना फोन करून हॉटेल जवळ बोलावून घेतले.

फिर्यादी सागर पवार व त्यांच्यासोबतचे तेथून त्यांच्या हातातून सुटून पळून जात असताना सेव्हनहिल उड्डाण पुलाजवळ पाठीमागुन येऊन गणेशचे मित्र दिनेश जाधव व सुरज गायकवाड व त्यांच्या अनोळखी मित्र पाठीमागून येऊन फिर्यादी सागर पवार याच्या पाठीवर चाकुने वार केला तसेच दिनेश जाधव याने जीवन गुलाब पवार यास पकडले व सुरज गायकवाड याने यांच्या पाठीवर चाकूने मारून गंभीर जखमी करुन जrवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच खिळा असलेली लाकडी फळीने जीवन गुलाब पवार यांचे डोक्यात गारल्यामुळे तो गंभीर जखगी होऊन बेशुध्द झाला. तसेच बांधकामात वापरत असलेली लाकडी बल्ली ने फिर्यादी व त्याच्यासोबतच्यांना मारुन जखमी केले.

त्यानंतर फिर्यादीने जीवन यास तात्काळ एम.जी.एम. दवाखाना येथे उपचार कामी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून जीवन यास अॅपेक्स दवाखाना येथे रेफर केले. जीवन पवारवर अॅपेक्स दवाखाना ICU रूम येथे उपचार चालु आहेत. त्यानंतर फिर्यादी पोलिस स्टेशन जवाहरनगर येथे येऊन पोलिसांनी मेडिकल मेमो दिल्याने घाटी दवाखाना येथे जाऊन उपचार घेतले.

याप्रकरणी फिर्यादी सागर पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल चालक गणेश, दिनेश जाधव, सुरज गायकवाड व त्याच्यासोबतच्या इतर चार पाच जणांवर गुरनं./01/2025 कलम 109, 118(1)118(2)189(2(4), 115(2),352, 126(2),3(5) BNS नुसार जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि खिल्लारे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!