महाराष्ट्र
Trending

भोकरदन ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या गरोदर महिलेच्या पोटाला जेली ऐवजी चक्क ऍसिड लावले!

JALNA  – जालना जिल्ह्यात दिवसान दिवस आरोग्य विभागात ढिसाळ कारभार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक गंभीर प्रकार आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात समोर आला आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी एक गरोदर माता आपल्या डोळ्यात स्वप्न घेऊन, भोकरदन ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी करिता आली. यावेळी डॉक्टरांनी तपासून सदर महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेले.

व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी व त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्सनी सदर महिलेच्या पोटाला सोनोग्राफीच्या वेळी जी जेली लावल्या जाते, ती न लावता चक्क ऍसिड लावले यामुळे सदर महिलेच्या पोटाला तात्काळ काळे चट्टे पडले आहेत, यासंदर्भात डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहे.
यात गरोदर महिलेचे नाव शीला भालेराव असल्याचे समोर आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!