महाराष्ट्र
Trending

वाल्मिक कराडचे SIT कनेक्शन, PSI महेश विघ्नेसोबत किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा: माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ – दोन कोटींची खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तपास यंत्रणेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन्हीचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे. अशा स्थितीत वाल्मिक कराडचे पोलिसांसोबतचे अतिशय जवळचे फोटो तपास प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

यासंदर्भात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर नमूद केले आहे की, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?

याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता आसल्या प्रमाणे काम केलेले आहे.

दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराड चा आत्यंत खास माणुस असूनन गेले १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असा आरोपही माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!