महाराष्ट्र
Trending

मुख्याध्यापकाने शिक्षकाला लाच मागितली, गटशिक्षणाधिकारी यांची सही घेण्याकरिता केली डिमांड !

छत्रपती संभाजीनगर- रजेवरुण हजर होण्याकरीता मुख्याध्यापकाने शिक्षकाला लाच मागितली. गटशिक्षणाधिकारी यांची सही घेण्याकरिता 2 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  दिनांक – 26/10/2024 व 28/10/2024 रोजी लाचेची मागणी करण्यात आली. कळंब चौक केज तालुका केज जिल्हा बीड येथे ही लाचेची मागणी करण्यात आली. आलोसे सुर्वे मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विडा तालुका केज जिल्हा बीड असे त्यांचे नाव आहे.

यातील मूळ तक्रारदार हे शिक्षक असून ते वैद्यकीय रजेवर होते. रजेवरुण हजर होण्याकरीता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारदार यांनी अर्ज केला त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी तुमचे मुख्याध्यापक सुर्वे यांच्याकडे अर्ज सादर करणे बाबत कळविले. त्यावरून मूळ तक्रारदार हे आलोसे मुख्याध्यापक सुर्वे यांना भेटले असता त्यांनी सदर अर्जावरून तक्रारदार यांना कर्तव्यावर हजर करून घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांची सही घेण्याकरिता 2000 रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यावरुन लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक सुर्वे यांनी तक्रारदार यांना पंचा समक्ष गट शिक्षण अधिकारी यांच्या करीता 2000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन लोकसेवक सुर्वे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- किरण बगाटे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड, पर्यवेक्षण अधिकारी – शंकर शिंदे, पोलीस उप अधिक्षक , ला. प्र.वि . बीड, सापळा पथक – पोलीस अंमलदार, गिराम, गरदे, गवळी, खरसाडे, पुरी ला. प्र. वि. बीड यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!