महाराष्ट्र
Trending

तोंडाला रुमाल बांधलेल्या चोरट्यांनी 10 लाख 50 हजार लांबवले ! चाटे शाळेजवळ सेवानिवृत्ताच्या हातातून बॅग हिसकावून चोरटे पसार !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २१ – हॉस्पिटलचे पैसे जमा करून घरी घेवून जात असतांना दोन चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकावून पळून गेले. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. एकुण 10,50000/- रुपये चोरट्यांनी लंपास केले. चाटे शाळेजवळ, सातारा, छत्रपती संभाजीनगर परिसरात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सखाराम दगडुजी शिंदे (वय- 72 वर्ष व्यवसाय – सेवानिवृत्त रा.प्लॉ नं -4 गट नं-96 चाटे शाळेजवळ मातारा परिसर , छञपती संभाजीनगर) यांना चोरट्यांनी लुटले.

नमुद तारिख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे नेहमी प्रमाणे त्यांचे हॉस्पिटलचे पैसे जमा करून घरी घेवून जात असतांना त्यांना काही कळण्याच्या आत हातात असलेली बँग दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून पळुन गेले. त्या बॅगमध्ये रोख रक्कम होती. याप्रकरणी पोउपनि सोनवणे यांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोउपनि भंडारे यांच्या कडे दिला आहे.

दोन चोरट्यांवर गुरन580/2024कलम -309(4),3(5) B.N.S नुसार सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!