
छत्रपती संभाजीनगर, दि. 13 –, भावाची सुपारी देऊन कट करून जबरी चोरी घडवून आणणा-या आरोपीस विरगाव पोलिसांनी शिताफिने अटक केली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २१/७/२०२२ रोजी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे विरगाव हद्दीतील शिरसगाव शिवारातील शेतवस्तीवरिल संतोष संजय राऊत हे घराबाहेर झोपलेले होते. घरी दोन अनोळखी व्यक्तींनी रात्री अचानक हल्ला करून त्यांची आई पुष्पा व वडिल संजय राऊत असे तिघांना, चाकूचा धाक दाखवून मारहाण केली.
बळजबरीने रोख रक्कम १०,०००/- सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण ४८,०००/- रूपयांचा माल बळजबरीने घेऊन जात असतांना संतोष राऊत यांचे वडिल संजय बापूराव राऊत यांनी विरोध केला. त्यांना चाकू मारून जखमी केले. या घटनेवरून पोलीस ठाणे विरगाव येथे भादंवी कलम ३९४ अन्वये दिनांक २२ / ७ / २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेतवस्तीवरील जबरी चोरीची गांर्भीयांने दखल घेत मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे अनुषंगाने विरगाव स.पो.नि. शरदचंद्र रोडगे यांना सूचना दिल्या. यावरून गुन्ह्याचा सचोटीने व बारकाईने तपास करित असताना विरगाव पोलीसांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारच्या माध्यमांतून या घटनेमध्ये संजय राऊत यांचा चुलत भाऊ पोपट बापुराव राऊत यांचा सहभाग असण्याची माहिती मिळाली.
यावरून विरगाव पोलीसांनी संशयित पोपट बापुरत राऊत यास ताब्यात व विश्वासात घेऊन विचारपुस केली. त्यांने सांगितले की त्याचा आणि त्याचा चुलत भाऊ संजय भाऊराव राऊत यांचा मागील ब-याचा दिवसापांसून शेतीचा बंधा-यावरून वाद चालु आहे. यावरून त्यांचे परस्पराविरुद्ध कोर्टात दावे दाखल असून यावरून तो सारखा वाद घालत असल्याने त्याला कायमचा धडा शिवण्यासाठी व धमकवण्यासाठी त्याची ५०,०००/- रूपयांमध्ये त्याचा ओळखीचा योगेश मधुकर हरणे याला सुपारी दिली होती.
यावरुन योगेश हरणे व त्याचे साथीदाराने दिनांक २१/७/२२ रोजी रात्री चुलत भाऊ संजय भाऊराव राऊत यांचे शेतवस्तीवरिल घरी हल्ला करून त्याला चाकु मारून जख्मी करून बळजबरीने रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने असा ऐवज घेऊन गेले होते.
यावरुन विरगाव पोलीसांनी तात्काळ यातील आरोपी योगेश मधुकर हरणे (वय २८ रा. जातेगाव ता. फुलंब्री ह.मु. महालगाव ता. वैजापूर) यांची गोपनीय माहिती काढून महालगाव येथे सापळा लावला. शिताफिने त्यास अटक केली आहे. त्यास विश्वासत घेऊन विचारपुस करता त्यांने नमुद गुन्हा त्याचा साथीदार आकाश शिरसाट (रा. कोळघर ता. गंगापूर) यांचे सोबत पोपट बापुराव पवार वय (५० वर्षे रा. शिरसगाव) यांच्या सांगणेवरून सुपारी घेऊन केल्याचे सांगितले आहे. यातील दोन आरोपीतांना अटक करण्यात आली असून पुढील तपास विरगाव पोलीस करित आहेत.
ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, शिलवंत नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर यांचे मार्गदर्शनाखाली शरदचंद्र रोडगे, पो.उप.नि. नवनाथ कदम पोलीस अंमलदार गणेश जाधव, सतिष गायकवाड योगेश तरमळे यांनी केली आहे.