
JALNA | – जालना शहरातील दोन दूध डेयरींवर महानगरपालिका पथकाने कारवाई करत, दोन क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत.
सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली असतानाही, या दूध डेयरीमधून या प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू होता.
ही बाब समोर आल्यानंतर महानगरपालिका पथकाने दुखीनगर भागातील पटेल आणि भारत दूध डेयरींवर धाड टाकली. या धाडीत तब्बल दोन क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत.






























