महाराष्ट्र
Trending

लाडकी बहीण योजनेवर हल्लाबोल! 🔥महिलांचा हक्क की राजकीय खेळ? 🤔महिलांचा संयम सुटला😡तहसील कार्यालयात गोंधळ!

JALGAON | लाडकी बहीण योजनेतील अडचणींविरोधात पाचोऱ्यात काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन  तालुक्यातील व शहरातील अनेक महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचे अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना, या प्रश्नाविरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. भाजपा–शिंदे सेना सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली असली, तरी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला असलेल्या अटी-शर्ती सध्या बदलल्या जात आहेत. वारंवार निकष बदलून ई-केवायसीची प्रक्रिया राबविल्यामुळे अनेक महिलांना अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या संदर्भात काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, उबाठा सेनेचे रमेश बाफना, माजी पंचायत समिती सदस्य अरुण तांबे यांनी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या दालनात शिंदाड येथील लाडक्या बहिणींच्या समस्या मांडल्या. तहसीलदार विजय बनसोडे यांनी संबंधित प्रकरणांची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट केले की, केवायसी पूर्ण करूनही जर महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नसतील, तर त्यांनी काँग्रेसशी संपर्क साधावा. ‘लाडकी बहीण’ योजनेतील रक्कम ही महिलांचा हक्क असून ती त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत लढा सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तसेच सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजनेचा राजकीय वापर करू नये व महिलांच्या भावनांशी खेळ करू नये, असे आवाहनही केले. येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींच्या हक्कांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!