महाराष्ट्र
Trending

नागपुरी खर्रा न देण्याच्या वादातून एकाचा मृत्यू

NAGPUR |- नागपुरी तर्री पोहे यासोबत नागपुरी खर्रा प्रसिद्ध आहे. मात्र खर्रा न देण्याच्या वादातून मारहाणीत दुखापत होऊन 48 तासाने एकाचा अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

– नागपूरातील अजनी पोलिस स्टेशन हद्दीत मध्ये राहणाऱ्या एका युवाकांने सोबतच काम करणाऱ्यांना खर्रा मागितला. खर्रा न दिल्याने भांडण झाले. या भांडणात हातातील कड्याने डोक्याला मारले.

यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र दोन दिवसांनी त्रास झाल्यानं मेडिकलमध्ये दाखल केले. उपचार सुरू होताच काही तासात त्याचा मृत्यू झाला. आर्यन वहिले मृतक तरुणाचे नाव आहे. राहूल हजारे आणि नागेश मेश्राम असं मारेकरी यांच नाव आहे

– या घटनेमध्ये रात्री भांडणं झालं होतं. त्यानंतर तब्बल 48 तासानंतर त्याला त्रास झाल्यानंतर रुग्णलयात गेला. तेव्हा त्याचा मृत्यू झाला

– घटनेच्या दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आर्यनचे वडील विलास वहिले यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती

– पोलिसांनी या प्रकरणात चोकशीत दोन आरोपी राहुल आणि नागेश यांना अटक केले आहे आणि पुढील तपास करत आहे

Back to top button
error: Content is protected !!