महाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्गावर शस्त्राचा धाक धाकवून लूटमार करणारी सराईत टोळी जेरबंद ! भोकरदनचे चोरटे गंगापूर तालुक्यात वसले अन् चोरी करू लागले !!

!!

छत्रपती संभाजीनगर, दि. २ – समृध्दी महामार्गावर वाहन चालकांना शस्त्राचा धाक धाकवून लुटणारी व डिझेल चोरी करणारी सराईत टोळी छत्रपती संभाजीनगर (ग्रा.) पोलीसांनी जेरबंद केली. सदरचे चोरटे हे भोकरदन तालुक्यातील मूळ रहिवासी असून त्यांचा हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात आहे.

पोलीस ठाणे शिल्लेगांच येथे दिनांक २०/१२/२०२४ रोजी गुरनं, ४५१/२०२४ कलम ३०९ (६) भारतीय न्याय संहिता अन्वये फिर्यादी मोहमद आफताब अजगर अली (वय ४२ वर्ष, व्यवसाय चालक रा. अकबरपूर चौराई ता. खागा जि. फतेहपूर उत्तर प्रदेश) फिर्याद दिली की, इगतपूर ते जालनाकडे गाडी क्रमांक एमएच-०३ डीयू ७९४९ ने समृध्दी महामार्गाने जात असताना सकाळी ०४:३० वाजेच्या सुमारास झोप येत असल्याने समृध्दी महामार्गाचे चॅलन क्रमांक ४५५ जवळ गाडी रोडच्या कडेला घेवून ड्रायव्हर सिटवर फिर्यादी मोहमद आफताब अजगर हे झोपले असता, काही अनोळखी लोकांनी त्यांना गाडीतून ओढून बाहेर काढून लाकडी दांड्यांनी मारहाण केली. एकाच्या हातात काटेरी हत्यार होते. त्याने डोक्यात मारहान करून पाकीटातील रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने चोरून सिल्हर रंगाच्या चारचाकी गाडीतून पळून गेले. या आशयाच्या मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

तसेच पोस्टे वैजापूर गुरनं. ७७६/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये दि. २०/१२/२०२४ रोजी फिर्यादी गजानन ज्ञानेश्वर पुंडे (वय ३० वर्ष व्यवयास चालक, रा. कळसा ता. डिग्रस जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली की, दि. २०/१२/२०२४ रोजी पहाटे ०४:१५ वाजेच्या सुमारास समृध्दी महामार्गावर चॅनलने ४८९ जांबरगांव शिवार ता. वैजापूर येथे त्यांना झोप येत असल्याने त्यांनी गाडी बाजूला लावून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीतील २४० लिटर डिझोल व इतर असे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी चोरी करून नेले.

या गुन्हयांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयातील आरोपीतांची गोपनीय बातमीदार यांचेकडून बातमी मिळाली की बाळू दगडूबा खिल्लारे (रा. टाकळी बाजार ता. भोकरदन जि. जालना, ह.मु. कमळापूर, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांने त्याचे साथीदारासह केला आहे. मिळालेल्या गुप्त बातमीवरून पथकाने कमळापूर येथे जावून बाळू दगडूबा खिल्लारे याचा शोध घेतला असता तो मिळून आला.

त्यास ताब्यात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारनामे २) विलास पंढरीनाथ नागवे रा. बोरगांव तारू पोस्टे वाळसा खालसा ता. भोकरदन जि. जालना, ह.मु. हनुमाननगर, कमळापूर, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर ३) सुनिल बाबासाहेब गायकवाड रा. हनवत खेड ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा, ह.मु. पवननगर, रांजनगाव शेणपुंजी ता. गंगापूर जि, छत्रपती संभाजीनगर, ४) गणेश गजानन नेमाडे रा, मनारखेडा ता. बाळापूर जि. अकोला ह.मु. शिक्षकनगर, शिवनेरी कॉलनी रांजणगाच शेणपुंजी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांचेसह केला असून चारही जण समृध्दी महामार्गावर चोरी व डिझेल चोरी करत असतो व गुन्हा करणेसाठी आम्ही आमच्या जवळ असलेली ग्रे रंगाची चारचाकी रेनॉल्ड डस्टर गाडी वापरली असल्याचे सांगून गुन्हा केल्याचे कबूल केले. यावरून त्यांचे इतर साथीदार क्रमांक २, ३, ४ यांचा त्यांचे राहते पत्यावर व परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले.

गाडी ही आरोपी क्रमांक १ हा राहत असलेल्या घराचे बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत लावली असल्याचे सांगून नमूद गाडीमध्ये त्यांनी चोरी केलेल्या डिझेलने भरलेली ३५ लिटर क्षमतेची कॅन सह दाखवली. नमूद चारचाकी गाडी व त्यामध्ये असलेल्या चोरीचे डिझेल कॅन सविस्तर जप्ती पंचनामा करून गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.

नमूद चारही आरोपीतांना पोस्टे शिल्लेगांव यांचे ताब्यात पुढील तपासकामी हजर करण्यात आले असून नमूद आरोपीतांनी पोस्टे शिल्लेगांव व पोस्टे वैजापूर येथे दाखल गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून आरोपीतांकडून ३,३७,२२०/- रूपयांचा मुददेमाल ज्यात एक चारचाकी वाहन, डिझेल, मोबाईल असा गुन्हे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून यापूर्वीही यातील आरोपी क्रमांक १ बाळू दगडूबा खिल्लारे यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे.राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सहा.पो.निरीक्षक, पवन इंगळे, पोलीस अंमलदार रवि लोखंडे, शिवानंद बनगे, अशोक वाघ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक निलेश कुडे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!