महाराष्ट्र
Trending

वैजापूर तालुक्यातील 40 गावांतील सुमारे 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अखेर सुरळीत | Vaijapur News

युद्ध पातळीवर काम करत महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत

Vaijapur News | Mahavitaran | Power Supply | Stormy Rain | Vaijapur | Shiur | Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत केला.

अंधार व पावसात 38 किमी पायपीट करून वीजपुरवठा पूर्ववत

वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात मंगळवारी दुपारी 5 वाजता वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे 33 केव्ही लोणी वाहिनीवर जरुल फाटा, खंडाळा, कोल्ही येथे वीज पडून पिन इन्सुलेटर फेल झाले. त्यामुळे या वाहिनीवर बिघाड होऊन शिऊर, लोणी व भादली या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी लगेचच धाव घेतली आणि युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रभर पावसात 38 किमी लांबीच्या या वाहिनीची चिखल तुडवत तपासणी केली. पाऊस सुरू असल्याने वीज कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र रात्रीच्या अंधारातही बॅटऱ्यांच्या उजेडात काम सुरूच होते. प्रत्येक विद्युत खांबाची पाहणी केली. त्यात 35 पिन इन्सुलेटर खराब झालेले आढळले. ते बदलून 40 गावांतील सुमारे 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी दीड वाजता सुरळीत केला.

झाडाच्या फांद्या पावसात हटवून वीजपुरवठा पूर्ववत

19 मेच्या रात्री जोरदार वारा व वादळामुळे 400 केव्ही वाळूज उपकेंद्रातून निघणाऱ्या 33 केव्ही रुरल फिडरवरील रांजणगाव पोल व तुर्काबाद ही दोन उपकेंद्रे बंद पडली होती. वीज कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन पेट्रोलिंग केली. 400 केव्ही उपकेंद्राच्या एका बाजूने कंपनीच्या भिंतीलगत मोठे झाड लाईनवर पडले होते. त्यामुळे तारा तुकडे होऊन पडल्या. हे काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यावर दोन्ही उपकेंद्रात 33 केव्ही वीरगुजर लाईन व तुर्काबाद उपकेंद्रातून बॅक फिडिंग फक्त गावठाण व एक्सप्रेस फिडर सुरू करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी रात्रीच तारेवरील पडलेले झाड व तारांमध्ये अडकलेल्या फांद्या काढल्या.

हे करण्यास पहाटेचे 4 वाजले होते. ज्या ठिकाणी तारा तुटल्या तेथे एमआयडीसीस जाणाऱ्या तीन 33 केव्ही फिडरची क्रॉसिंग होती. रात्री हे काम करणे शक्य नसल्याने 20 मे रोजी करण्याचे ठरले. मात्र एमआयडीसीतील औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या 33 केव्ही एम सेक्टर, तिल्योसॉट व एंड्युरन्स हे क्रॉसिंग असणारे तीन फिडर बंद केल्याशिवाय तारा जोडणे शक्य नव्हते. त्यासाठी 3 तास लागणार होते. पण औद्योगीक ग्राहक बाधित होणार होते. या लाईनवर पुढे दोन उपकेंद्रावर असणारे सर्व कृषिपंप व पाणीपुरवठा योजना बंद होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व उद्योजकांचे मन वळवून कामासाठी तीन तास विद्युतपुरवठा बंद करण्यास होकार दिला. त्यानंतर पडत्या पावसाची तमा न करता ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच म्हणजे अडीच तासात सायंकाळी साडेपाच ते आठ वेळेत काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत केला.

चिखलात वाहन फसूनही वीज पूर्ववत

शुकवारी (16 मे) भेंडाळा शिवारात वादळी पावसामुळे खांबावर झाडे पडल्यामुळे 10 ते 12 गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला. मात्र काळ्या मातीची जमीन असल्याने चिखलात काम करणे जोखमीचे होते. खांब वाहून नेणारे वाहन चिखलात फसत होते. तरीही मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी कौशल्याने खांब उभा केला आणि प्रतिकूल परिस्थितीत 700 ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवार सायंकाळी सुरू केला.

Your Queries:

Vaijapur
Aurangabad Vaijapur News
Vaijapur News
Aurangabad Vaijapur Hatyakand
Vijapur
Vaijapur Rain
Vaijapur Branch
Vaijapur Taluka
Vaijapur Robbery
Vaijapur Accident
Vaijapur Bank Blast
Gangapur Waijapur Road
Gautami Patil Vaijapur
Vaijapur Sairat Murder
Vaijapur Copy in 12th Board Hsc Exam
Bornare vs Pardeshi Vaijapur Vidhansabha
Vaijapurnews
Vaijapurbankfire
Chandrapurnews
Pune News
Mumbai News

 

#vaijapurnews
#mahavitaran
#powersupply
#stormyrain
#vaijapur
#shiur
#chhatrapatisambhajinagar
#weatherupdate
#electricityupdates
#rainfall
#localnews
#maharashtraweather

Back to top button
error: Content is protected !!