महाराष्ट्र
Trending
अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींची पुन्हा करणार पडताळणी मोठा खुलासा!
ई-केवायसीनंतरही लाभ थांबला कसा?

बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ई केवायसी केल्यानंतर राज्यातील 22 लाखापेक्षा अधिक तर बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 30 हजार महिलांचा गेल्या दोन महिन्यापासून लाभ थांबला आहे,
यामुळे महिलांमध्ये मोठा संभ्रम पसरला होता. या सर्व महिलांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे, आणि त्यानंतर पात्र महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघुळे यांनी दिली आहे.
त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता अंगणवाडी सेविकांकडे आपली अचूक माहिती द्यावी, असे आवाहन देखील महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येत आहे.































