महाराष्ट्र
Trending

क्रीडा कार्यालयात 21 कोटींचा महाघोटाळा, संगणक ऑपरेटर लिपिकाने सरकारी बॅंक अकाऊंट स्वत:च्या मोबाईलवर नेट बॅंकिंगद्वारे सहा महिने कोट्यवधी खर्चून केली मौज मजा !!

छत्रपती संभाजीनगर, दि. 22 – विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यास स्वत:च्या मोबाईलवर नेट बॅंकिंग सुरु करून अवघ्या सहा महिन्यात तब्बल 21,59,38,287 रुपयांचा महाघोटाळा करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विभागीय उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर विभागाचे तब्बल सहा महिने आपल्या बॅंक खात्याकडे लक्ष न गेल्याने सरकारी कामावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. हा महाघोटाळा संगणक ऑपरेटर लिपिकाने केला असल्याचे या घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर रुतली आहेत, याचा शोध आता आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे.

तेजस दीपक कुलकर्णी (वय 36, व्यवसाय नौकरी, क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर विभाग, जि.छत्रपती संभाजीनगर रा. फ्लॅट नंबर 5, दुर्वाकुंर अपार्टमेंट, नंदीग्राम कॉलोनी, एसआर पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर)  यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार यातील आरोपी क्रं. 1 व 2 (1. हर्षकुमार अनिल क्षीरसागर रा.बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर संगणक ऑपरेटर/लिपिक 2. यशोदा शेटटी, रा. लिपिक) यांनी संगणताने विभागीय क्रीडा संकुल समिताचे बँक खात्यास नेट बँकिंग सुविधा चालु करून घेण्यासाठी उपसंचालक यांचे नाव व स्वक्षरीचा बनावट वापर केला. कार्यालयीन कामकाजातील जुने पत्राची छेडछाड TAMPERING करुन बँकेस खोटे व बनावट मजकुराचे पत्र तयार केले.

आरोपी क्रं. 1 हर्षकुमार अनिल क्षीरसागर याने स्वतःचा मोबाईल क्रमांकावर नेट बँकींग सुविधा चालु करण्यासाठी बनावट ई मेल आयडी तयार करून सदर ई मेल आयडीवर विभागीय क्रीडा संकुल समितीच्या नावे असलेल्या खाते व नेट बँकिंग सुविधा चालु करण्यासाठी पत्र पाठवून नेट बँकींग सुविधा चालु करून घेऊन स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी स्वतःचे खात्यावर वळवून त्यानंतर सदर रक्कम इतर खात्यावर वळते केली. एकूण 21,59,38,287 रुपये (एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार 287 रुपये) रक्कमेचा गैरव्यवहार करुन, अपहार करुन फिर्यादी व शासनाची फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये 1. हर्षकुमार अनिल क्षीरसागर रा.बिड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर संगणक ऑपरेटर/लिपिक 2. यशोदा शेटटी, रा. लिपिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आर्थीक गुन्हे शाखा करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!