महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी व शाळास्तरावर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी !

छत्रपती संभाजीनगर, – अंगणवाडी व शाळास्तरावर ० ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत असून तपासणीअंती गंभीर आजार आढळल्यास तात्काळ संदर्भित करण्याचे निर्देश असून याबाबत आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला.

देवगिरी महाविद्यालयातील गुरुदेव रविंद्रनाथ टागोर सभागृहात हा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बढे व सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच शिक्षणविभागांतर्गत सर्व केंद्र प्रमुख व शिक्षक वर्ग तसेच जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील ० ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांची व शालेय विद्यार्थ्यातील १८ वर्ष पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करुन काही गंभीर आजार असल्यास त्यांना संदर्भित करावे,असे निर्देश देण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!