महाराष्ट्र
Trending

मंत्री धनंजय मुंडेंना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा कडक इशारा, सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला हात लावाल तर रस्त्यावर फिरू देणार नाही !

देशमुख त्यांच्या कुटुंबीयाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरु देणार नाही

परभणी, दि. ४- स्व. संतोष देशमुख यांचे बंधू काल परवा पोलिस स्टेशनला गेले. त्यांना धमकी देण्यात आली. मी आत्तापर्यंत नाव घेवून कधी बोललो नाही.  माझा स्वभाव आहे कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटला जात नाही. आमचे संतोष भय्या आता तर गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख त्यांच्या कुटुंबीयाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा कडक इशारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत मूक मोर्चादरम्यान मंत्री धनंजय मुंडेंना दिला.

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्या या प्रमुख मागणीसाठी परभणीत आज सर्व पक्षिय सर्व समाजाचा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून परभणीत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मी ज्यास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो ज्यावेळेस ते काल परवा पोलिस स्टेशनला गेले. त्यांना धमकी देण्यात आली. मी आत्तापर्यंत नाव घेवून कधी बोललो नाही.  माझा स्वभाव आहे कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटला जात नाही. आमचे संतोष भय्या आता तर गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख त्यांच्या कुटुंबीयाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरु देणार नाही.

आमचा एक भाऊ गेला तो आम्ही सहन केला. या मुंडेंच आम्ही नावसुद्धा घेतलं नाही. पण जर देशमुख कुटुंबीयांना त्रास झाला तर एकालासुद्धा रस्त्यानं फिरु देणार नाही. परभणीच्या बांधवानांही सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो वा बीड जिल्हा असो आपल्या समाजाला जर त्रास झाला  तर परभणी आणि पलीकून धाराशीव यांना घरात घुसू घुसू हाणायचं.. जर इथून पुढं जर यांनी लोकांना त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकडून धाराशिव यांनी यांना बघायचंच.  हे बघा मी असलं कधी बोलत नाही. पण व्यासपीठावर जमलेले सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार.. ज्या वेळेस आस्मितेचा विषय येतो त्यावेळेस हे सहन होत नाही.  आम्हाला माज नाही. आम्हाला मस्तीपण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघडे पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची.

कसं जगायचं त्या पोरीनं आणि पोरानं. तुम्ही जर लोकं मारून आरोपी तुमच्या घरात लपवून ठेवता. यांना पुण्यात नेमकं सांभाळलं कोणी, सगळे आरोपी नेमके पुण्यातच का सापडायला लागलेत,  याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्री यांना सांभाळायला लागलेत. या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणार्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे. आरोपींना फाशी जर नाही झाली ना, आत्ताच खासदार म्हणाले, चार्जशीट कच्च होता कामा नये. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून  जर का चार्जशीट कच्च झालंच आणि त्याच्यातील एक आरोपी जरी बाहेर आला तर मंत्री गोट्यानं हाणलाच.

आता तुम्हाला हिच भाषा कळते. आता आमचा नाईलाज आहे. आम्ही करतो तो जातीवाद म्हणता.. संतोष भय्या देशमुखच्या हत्त्याचा न्याय मागितला तर आम्हाला जातीयवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे. हे नवीन षडयंत्र सुरु झालय. आपण जर संतोष भय्या देशमुख यांच्याकडून बोललो तर आपल्याला हे जातीयवादी म्हणतात. आणि तुम्ही आरोपींना सांभाळताहेत मग हे काय आहे. तुम्ही आरोपीला गाड्यात घेवून पळताहेत, ते काय आहे. संतोष देशमुख यांना तुम्ही क्रुरपणे मारलं तो जातीयवाद नाही का, आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीयवादी.  आणि तुम्ही कोणाचंही ओरबाडून खाताहेत मग तुम्ही जातीयवादी नाही, यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, इथून पुढच्या काळात आपण सावध रहा. जर आपल्या समाजावर अन्याय झाला तर आपल्यालाही घरात घुसून त्यांना बाहेर काढावं लागणार आहे. नाईलाज आहे आपला. आपल्या लेकराचं जर तुकडे होणार असले तर सहन करायचीसुद्धा काही परिसीमा असते.

Back to top button
error: Content is protected !!