
NAVI MUMBAI | वादाचा राग मनात ठेवून मित्राने केला मित्रावर हल्ला आरोपी अटके आग्रोळी गावातील हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या रविकुमार बैस आणि सुनील काळे यांच्यामध्ये आय.पी.एल मॅचदरम्यान वाद झाला होता. याचा राग डोक्यात ठेऊन सुनील काळे याने रवी कुमार झोपेत असताना त्याच्यावर ब्लेडने हल्ला चढवत वार केले.
घटने नंतर सुनील पळून गेला तर रविकुमार ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सिबिडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपास करत आरोपी सुनील काळे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेय.