महाराष्ट्र
Trending

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा ! वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंडांचे राज्य चालू देणार नाही, खंडणी मागता येणार नाही !!

काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ- फडणवीस

मुंबई, दि. ३१- काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यातन काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहवं. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून देवू, असं आश्वासन देवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर स्पष्ट बोलनं टाळलं. गुंडांचे राज्य चालू देणार नाही, खंडणी मागता येणार नाही. या प्रकरणाला आता गती आल्यामुळेच मुळेच आज त्यांना (वाल्मिक कराड यांना) त्या ठिकाणी शरणागती करावी लागली असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बीडच्या प्रकरणांमध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडाचं राज्य आम्ही चालू देणार नाही. कुणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. या दृष्टीने तपासा अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती करावी लागली आहे.

आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्या करता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे त्यांनाही मी आश्वस्त केलेले आहे की तुम्ही काळजी करू नका काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंत कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे.

कोणचा गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील ते पोलिसांचं काम आहे ते जे पुराव्या त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेला आहे. त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रिफिंग करतील जाणीवपूर्वक केस सीआयडीला देण्यात आलेली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही. कुठलाही दबाव राहणार नाही. कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील.

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे काही आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले… 

कोण काय म्हणतं हा विषय नाही. विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही. काही पत्रकारांनी विचारलेल्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही. मी पहिल्यापासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या. ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल, आम्ही शोधतो आहे. कोणाजवळ दुसर्याजवळ असेल त्यांनीपण तो पुरावा द्यावा. पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हस्तेला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचं आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यातन काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहवं. मात्र आमची भूमिका स्पष्ट स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून देवू, असं आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं.

Back to top button
error: Content is protected !!