अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू, महाराष्ट्र हादरला !
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात

बारामती (Baramati) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येत असलेल्या विमानाला आज लँडिंगदरम्यान अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक अडचण निर्माण झाली, त्यामुळे पायलटने तातडीने नियंत्रण ठेवत क्रॅश लँडिंग केली. यात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते. लँडिंगच्या वेळी विमानाचा समतोल बिघडला, त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. अपघातानंतर काही काळ धूर दिसून आला, मात्र मोठी आग लागली नाही.
या विमानात अजित पवार यांच्यासह इतर काही जण होते. काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. धावपट्टी परिसर तात्काळ सुरक्षित करण्यात आला. विमानतळ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी हालचाल थांबवली होती.
या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. विमानातील तांत्रिक बिघाड, लँडिंगवेळी हवामान परिस्थिती आणि पायलटचे निर्णय यांचा सखोल तपास केला जाणार आहे.






























