
AMRAVATI |- अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे एसटी आगाराची बस बेलोरा या गावी जात असतांना चिंधादेवी फाट्याजवळ अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान घडली.
यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर एकूण 9 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना चांदूर रेल्वे वरून अमरावती येथे रेफर करण्यात आले.
तर बस मधील इतर काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत. या घटनेत कंडक्टर हा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
चांदूर रेल्वे बस डेपो येथे पोहचलो. बसमध्ये बसल्यानंतर काही अंतरावर बस एका झाडावर जाऊन धडकली. बस धडकल्यानंतर प्रवाशांच्या अंगावर बस मधल्या खिडकीच्या काचा पडल्या. त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले, असे प्रावाशांचे म्हणणे आहे.