महाराष्ट्र
Trending
“मुलगी नको” या बुरसटलेल्या मानसिकतेने पुन्हा एकदा डोकं वर काढले. मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून छळ

BEED | – “मुलगी नको आहे” या बुरसटलेल्या मानसिकतेने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या माहेरवासिनीला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ करण्यात आला. संधी मिळताच बाळाला घेऊन विवाहितेने बीड गाठले आणि बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली.
याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.