
BEED | – बीडच्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही जिल्हा परिषद शाळेची भिंत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. शाळेची भिंत कोसळल्याने शिक्षकांना आज शाळेच्या प्रांगणात शाळा भरवावी लागली.
जिल्ह्यातील 349 शाळेच्या 592 वर्गखोल्या धोकादायक असल्याच वास्तव आहे. मात्र अद्याप शिक्षण विभागाकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यात ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत. या वर्ग खोल्या दुरुस्त व्हाव्या अशी मागणी पालकांनी केली.