
CHH. SAMBHAJINAGAR – छत्रपती संभाजी नगर शहरातील काळा गणपती परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. एका चार चाकी वाहनाने तब्बल सहा जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्यामध्ये एकाचा अंत झाला आहे.
तर अन्य पाच जणांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमदाडे असे मृत व्यक्तींचे नाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
३ जखमी ना मिनी घाटीत दाखल करण्यात आले. तर त्यातील एक व्यक्ती हा मृत झाला. इतर दोन जणांना मोठ्या घाटीत नेण्यात आले, तर तीन जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.