महाराष्ट्र
Trending

फुलंब्री तालुक्यात विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून 25 लाख रुपये घेऊन ये म्हणत शोल्डरने शरीरावर 17 ठिकाणी चटके देऊन छळ

|CHH. SAMBHAJINAGAR  – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या चौका येथे राहणाऱ्या हिना शेख या विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून 25 लाख रुपये घेऊन ये म्हणत शोल्डरने शरीरावर 17 ठिकाणी चटके देऊन छळ केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर हिनाने पोलिसात तक्रार दिली, आणि आज अखेर हिनाचा नवरा अजीमसह सासू, दीर, जाऊ आणि 2 नणंद अशा सहा जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुलंब्री पोलिसांकडून या आरोपींची चौकशी सुरू असून, दोन वर्षापूर्वी अश्याच प्रकारे हिनाच्या पतीने तिला पैशांची मागणी करत शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यावेळी हिना गर्भवती होती आणि याच मारहाणीत तिच्या पोटावर दुखापत झाली त्यामुळे बाळही दगावले. या सततच्या जाचाला कंटाळून तिने फुलंब्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत सहाही आरोपींना आता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Back to top button
error: Content is protected !!