संभाजी नगरमध्ये डॉक्टरांना धक्काबुक्की प्रशासनाने केला आरोपी विरोधात गुन्हा दाखल

CHH. SAMBHAJINAGAR – तुम्ही रुग्णावर व्यवस्थित उपचार करत नाहीत असे म्हणत पदवीधर प्रशिक्षणार्थी डॉक्टराला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली होती. हा प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला. याप्रकरणी डॉक्टरला धक्काबुक्की करणाऱ्या राजू निजाम शेख, रफिक निजाम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशिक्षणार्थी डॉक्टर अक्षय किशनराव ताटे हे काम करत असताना, वार्ड क्रमांक 203 मध्ये उपचार घेत असलेल्या सुविधा राजू शेख या महिलेच्या उपचारावरून तिचा पती राजू निजाम शेख व भाऊ रफिक निजाम शेख यांनी संताप व्यक्त केला. डॉक्टर अक्षय ताठे यांच्याशी वाद घातला, वादा दरम्यान त्यांनी डॉक्टर ताठे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत काम अडविले. यासाठी त्यांच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालय अधिष्ठता दयानंद मोतीपोळे यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.