शिवराज पाटील चाकूरकरांनी कोणती भगवतगीता वाचली ? गीतेत जिहादचा उल्लेख नाही: विहिंप नेते परांडे

- शिवराज पाटील चाकूरकर यांचे जिहाद आणि भगवतगीतेबद्दलचे वक्तव्य बेजबाबदार असून प्रसिद्धी मिळवून समाजात संभ्रम निर्माण करणे हा त्यांचा उद्देश असल्याची टीका करण्यात आली.
नागपूर (महाराष्ट्र), 21 ऑक्टोबर (पीटीआय) – विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की भगवद्गगीतेत जिहादचा उल्लेख नाही.
येथे पत्रकारांशी बोलताना विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर अल्पसंख्याक तुष्टीकरणात गुंतले असल्याचा आरोप केला. प्रसिद्धीसाठी आणि समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.
विहिंप नेते म्हणाले की, “त्यांनी (शिवराज पाटील चाकूरकर) कोणती गीता वाचली हे मला माहीत नाही. गीतेत जिहादचा उल्लेख नाही.
पाटील यांनी गुरुवारी दावा केला की जिहाद (पवित्र युद्ध) ही संकल्पना केवळ इस्लाममध्येच नाही, तर भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, इस्लाम धर्मात जिहादचा भरपूर उल्लेख आहे.
पाटील यांनी आपल्या टिप्पण्यांमध्ये दावा केला, “केवळ कुराणातच नाही, तर महाभारतातही… गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाशी जिहादबद्दल बोलतात आणि हे केवळ कुराण किंवा गीतेतच नाही तर ख्रिश्चन धर्मात सुद्धा आहे.”
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता विहिंप नेते परांडे म्हणाले की, ते (पाटील) बेजबाबदार असून प्रसिद्धी मिळवून समाजात संभ्रम निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे.