डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढवले, दोघांवर गुन्हा दाखल !
पोलिस स्टेशन बेगमपुरा

- एकूण 23 विद्यार्थ्याचे परस्पर गुण वाढवून गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या. त्यानंतर डेटा बेसमधून (संगणकामधून ) गुण डिलीट करून टाकण्यात आले.
औरंगाबाद, दि. 6 – नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याची धक्कादायक बाब समोर आली असून याप्रकरणी कक्षाधिकारी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभागामध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवसाय संचालक (परीक्षा व मुल्यमापन) गणेश रायभान मंझा (वय- 47 वर्षे, व्यवसाय संचालक, रा. , औरंगाबाद) यांनी याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.
या तक्रारीवरून दिनेश रंगनाथ पांढरे क्य 32 वर्ष ( कक्षाधिकारी) रा. इम्पेक्ट ट्रेड सेंटर ए-7 दुसरा मजला पडेगाव औरंगाबाद व कोमल किसन गवळी वय 28 वर्ष रा. साई स्वीकार प्लॉट नं 183 सिडको महानगर 1 औरंगाबाद यांच्यावर गुरन – 191/2022 कलम 409, 420, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.08/11/2019 ते दि.29/11/2019 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभागामध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी दि.05/11/2022 रोजी 16.30 वाजता बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात संचालक (परीक्षा व मुल्यमापन) गणेश रायभान मंझा यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, मार्च / एप्रील 2019 मध्ये डॉ. बा. आ. म. वि. मार्फत औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील महाविद्यालयात एम. एस्सी रसायन शास्त्र, डि फॉर्मसी या विषयांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल डॉ. बा.आ.म.वि. मार्फत मे 2019 मध्ये जाहीर करण्यात आला होता. त्या निकालात: नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. बा. आ. म. विद्यापिठाकडे पुर्नतपासणी करिता रितसर अर्ज दिले होते.
यातील आरोपीतानी, संगणमत करून त्यापैकी नापास झालेल्या एम. एस्सी रसायन शास्त्र या विषयातील सहा विद्यार्थ्यांचे प्रत्येकी दोन सत्रांचे गुणपत्रकेतील गुणवाद मिळून 12 विद्यार्थी याचे गुण बदल करताना कोमल किशन गवळी यांनी PSDKODE या नावाच्या युजर आय डी चा वापर करुन दि.08/11/2019 ते दि. 29/11/2019 पावेतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग औरंगाबाद येथे मूळ गुणांमध्ये वाढ केल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच दि. फॉर्मसी या विषयातील विद्यार्थी असे 1-1 विद्यार्थी, दोन्ही अभ्यासक्रम मिळून एकूण 23 विद्यार्थ्याचे परस्पर गुण वाढवून गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या. त्यानंतर डेटा बेसमधून (संगणकामधून ) गुण डिलीट करून टाकण्यात आले.
वरील आरोपी यांनी बेकायदेशीररित्या गुणपत्रिकेत गुण वाढवून वितरीत करून बनावट गुणपत्रीका तयार करून विद्यापिठाची फसवणूक केली म्हणून पोनि पोतदार याच्या आदेशाने डिओ अधिकारी पोउपनि चौहाण यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी पोउपनि भालेराव यांचेकडे दिला.