गर्लफ्रेंडला फोन का केला म्हणून चाकू हल्ला ! गव्हरमेंट इन्स्ट्यिट्यूट ऑफ फॉरेन्सिक कॉलेजच्या गेटजवळ विद्यार्थ्यांच्या छातीवर चाकूने वार !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ – मैत्रिणीला फोन का केला म्हणून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना 02/01/2025 रोजी सांयकाऴी 05.30 वाजेच्या सुमारास गव्हरमेंट इन्स्ट्यिट्यूट ऑफ फॉरेन्सिक कॉलेज गेटच्या जवळ पहाडसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे घडली.
रोहीत घनशाम पराते (वय 21, रा. आरमोरी, गडिचरोली, ह.मुक्काम बॉईज हॉस्टेल, पहाडसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, यातील आरोपी प्रसाद फाटकर (रा. ता. जि. अकोला) याने फिर्यादी रोहीत पराते यास आरोपीची मैत्रिण हिस फोन का केला या कारणावरून यातील आरोपीने फिर्यादीस व फिर्यादीचा मित्र रत्नपाल यास शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. त्या नंतर फिर्यादीच्या छातीवर डाव्या बाजुस व रत्नपाल याच्या उजव्याहातावर चाकुने मारून दुखापत केली. त्यानंतर फिर्यादी व त्याचे मित्र पोस्टे बेगमपुरा येथे गाडीवर येत असतांना तुला बघुन घेईन अशी धमकी प्रसाद फाटकर याने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी रोहीत घनशाम पराते (वय 21, रा. आरमोरी, गडिचरोली, ह.मुक्काम बॉईज हॉस्टेल, पहाडसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रसाद फाटकर (रा. ता. जि. अकोला) याच्यावर गु.र.नं02/2025 कलम 118 (1),115(2), 352,351(2) BNS नुसार बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.